दोडामार्ग नगरपंचायतीचे
शहरवासीयांना आवाहन

दोडामार्ग नगरपंचायतीचे शहरवासीयांना आवाहन

Published on

दोडामार्ग नगरपंचायतीचे
शहरवासीयांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २ : स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत कसई-दोडामार्ग नगरपंचायतच्या सफाई कामगारांचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता. ५) दुपारी २ वाजेपर्यंत शहरातील घंटागाड्यांमार्फत होणारे कचरा संकलन बंद राहणार आहे, अशी माहिती नगरपंचायत प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार दैनंदिन घनकचरा संकलनाच्या मॉनिटरिंगसाठी शहरात आयसीटी बेसप्रणाली कार्यरत केली आहे. या अनुषंगाने स्वच्छ भारत अभियान नागरी २.० अंतर्गत नगरपंचायतमध्ये कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांचे शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत प्रशिक्षण आयोजित केले आहे. त्यामुळे कसई-दोडामार्ग शहरातही सर्व घंटागाड्‌यांमार्फत होणारे कचरा संकलन दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. दुपारी २ नंतर सर्व प्रभागांतील कचरा संकलन सुरू करण्यात येईल, याची शहरातील नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.