रत्नागिरी- मोकाट गुरे, खराब रस्ते, डेंगीच्या प्रश्नावर भाजपा आक्रमक

रत्नागिरी- मोकाट गुरे, खराब रस्ते, डेंगीच्या प्रश्नावर भाजपा आक्रमक
Published on

rat2p29.jpg
94258
रत्नागिरी : मुख्याधिकारी तुषार बाबर यांना मागण्यांचे निवेदन देताना भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, राजन फाळके, दादा ढेकणे आणि पदाधिकारी, कार्यकर्ते. (मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)

खराब रस्ते, डेंगीच्या प्रश्नावर भाजप आक्रमक

पालिकेवर अचानक धडक; पाईपलाईनच्या खोदकामाला खो

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : शहरात मोठ्या प्रमाणात डेंगीचे रुग्ण सापडत असून, मोकाट गुरांसह कुत्र्यांचा प्रश्नही जैसे थेच आहे तसेच पावसाळ्याच्या सुरवातीलाच ठिकठिकाणचे रस्ते खड्डेमय झाले आहेत. या नागरिकांच्या समस्यांवर आक्रमक झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या समस्यांवर तातडीने उपाययोजना करा, अशी मागणी भाजपतर्फे मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याकडे करण्यात आली. यावर तत्काळ बैठक घेऊन त्यावर तोडगा काढू, अशी ग्वाही मुख्याधिकाऱ्यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला दिली.
जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहराध्यक्ष राजन फाळके यांच्यासह माजी नगरसेवकांनी पालिकेवर अचानक धडक दिली. रत्नागिरी शहरात सध्या अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शहरात उनाड गुरांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. रस्त्यांवर अनेक ठिकाणी उनाड गुरांमुळे अपघात होत आहेत तसेच शहरात डेंगी आजाराचे रुग्ण आढळत आहेत. पालिकेने संपूर्ण शहरात एकाच वेळी औषध फवारणी करणे आवश्यक आहे, तसेच शहरात अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेले दिसून येत आहेत. हे खड्डे जांभ्या डबरने बुजवले जातात; मात्र हे खड्डे पावसाळी डांबर वापरून बुजवणे आवश्यक आहेत. उनाड गुरांचा बंदोबस्त करणेही आवश्यक आहे. स्वच्छता करताना ब्लिचिंग पावडरचा वापर करावा, अशी मागणी करत सर्व प्रश्नांवर त्वरित मार्ग काढून कामे पूर्ण करावीत, असेही जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी मुख्याधिकाऱ्यांना सांगितले.
शहरात अनेक ठिकाणी पाईपलाईनद्वारे गॅस दिला जात आहे. त्याकरिता पाईपलाईन टाकण्याचे काम भर पावसात सुरू आहे. तसेच काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या पावसाळ्यात गॅस पाईपलाईनच्या खोदकामाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. पावसाळ्यात रस्ता सुस्थितीत राहणे अत्यावश्यक असल्याने पाईपलाईनचे खोदकाम तत्काळ थांबवा, अशी मागणी यावेळी जिल्हाध्यक्षांनी केली. हे खोदकाम आपण थांबवण्यास सांगितले असल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली.
याप्रसंगी भाजपचे माजी नगरसेवक मुन्ना चवंडे, राजू तोडणकर, उमेश कुळकर्णी, सुप्रिया रसाळ, संपदा तळेकर यांच्यासह भाजपचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. हृषिकेश केळकर, भाजपचे माजी शहराध्यक्ष सचिन करमरकर, शेखर लेले, नितीन गांगण, तसेच दादा ढेकणे आदी उपस्थित होते.
------
चौकट १
मोकाट गुरे सांभाळणार
रत्नागिरीतील सामाजिक संस्था मोकाट गुरे सांभाळण्यास तयार आहेत. पावसाळ्याच्या काळात चार महिने ओला चारा उपलब्ध असतो. त्यानंतर ऑक्टोबर ते मे महिन्यापर्यंत चाऱ्याचा पुरवठा करावा, अशी या संस्थेची मागणी आहे. कायदेशीर बाजू सांभाळून पालिकेने त्यांना मदत करावी. ते लवकरच प्रस्ताव देणार आहेत, असे राजेश सावंत यांनी मुख्याधिकाऱ्यांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com