

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर
नाईकांचे अधिवेशनात बोट
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ ः एसटी कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतन वाढ थकबाकीबाबत आमदार वैभव नाईक यांनी अधिवेशनात आवाज उठविला.
यावेळी आमदार नाईक यांनी विविध प्रश्न मांडून सभागृहाचे लक्ष वेधले.
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घर भाडे भत्ता, वेळेत वेतन मिळावे वार्षिक वेतन वाढीचा वाढीव दर व थकबाकी मिळावी, या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत पावसाळी अधिवेशनात आज तारांकित प्रश्न मांडण्यात आला. त्यावर आमदार नाईक यांनी बोलताना राज्याने एसटी कर्मचाऱ्यांना दिलेली आश्वासने अद्यापपर्यंत पूर्ण केलेली नाहीत, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. एसटी कर्मचाऱ्यांचे ५७ महिन्यांच्या घरभाडे भत्ता देयकाची थकबाकी शिल्लक आहे. घरभाडे भत्त्याची आणि वार्षिक वेतन वाढीची थकबाकी एसटी कामगारांना मिळालेली नाही. कामगार करारापोटी जाहीर केलेल्या ४८४९ कोटी रुपयांचे पूर्ण वाटप झालेले नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना मंत्री न्याय देतील काय० आणि ९ ऑगस्टला राज्यभर एसटी कर्मचारी आंदोलन छेडणार आहेत ते स्थगित करणार का० अशी विचारणा आमदार नाईक यांनी सरकारकडे केली. त्यावर उत्तर देताना मंत्री दादा भुसे म्हणाले, ‘‘एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत केली आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील मार्गक्रमण केले जाईल. त्याचबरोबर भत्त्यांच्या संदर्भांत कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे.’’
94385
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.