गोळप सौर प्रकल्पाचा १५ दिवसात वीज खरेदी करार

गोळप सौर प्रकल्पाचा १५ दिवसात वीज खरेदी करार

Published on

९४३१९

गोळप प्रकल्पामुळे पथदीपांचे बिल शुन्यावर
९४ ग्रामपंचायतींचा समावेश; वीज खरेदी करार प्रक्रिया येत्या १५ दिवसात

चौकट
एक नजर
* १ मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प
* ८ कोटी ३० लाख मंजूर
* खर्च १३ वर्ष निघणार भरून
* आयुर्मान २५ वर्षांपेक्षा जास्त
* ५ एकर जागेत होणार उभारणी

रत्नागिरी, ता. २ : तालुक्यातील गोळप येथील १ मेगावॅट सौरप्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा परिषदेचा राज्यातील हा पहिला पथदर्शी प्रकल्प ठरणार असून वीज खरेदी करार प्रक्रिया येत्या १५ दिवसात केली जाणार आहे. महावितरणला ही वीज विकत देऊन त्यातून येणाऱ्या पैशातून स्ट्रीटलाईटचे वीजबिल भागवले जाणार आहे. त्यामुळे तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतीच्या स्ट्रीटलाईटचे वीजबिल लवकरच शुन्यावर येणार आहे.
उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प मंजूर झाला आहे. जिल्हा परिषदेच्या अपारंपरिक ऊर्जा विकास कार्यक्रमअंतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील सर्व स्ट्रीटलाईटसाठी ११ लाख ८० हजार युनिट्स दरमहिना लागते. त्याची रक्कम ६० लाख एवढी आहे तर प्राथमिक आरोग्यकेंद्रासाठी २.२५ लाख युनिट्सचा वार्षिक वापर आहे.
साधारणपणे स्ट्रीटलाईट्सच्या बाबतीत १२ महिन्याला १४१.६ लाख युनिट्सचा वार्षिक वापर आहे. पुरेशा प्रमाणात वेळोवेळी निधी उपलब्ध होत नसल्याने पारंपरिक वीजपुरवठा महावितरण वीज कंपनीकडून खंडित केला जातो. त्यामुळे स्थानिक जनतेला अडचणींचा सामना करावा लागतो.ही अडचण दूर करण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत १ मेगावॅटचा सोलर प्रकल्पाला मान्यता देत निधी उपलब्ध करून दिला. जिल्ह्यात एकूण १ मेगावॅटचा सोलर प्रकल्प आस्थापित करण्यात येणार आहे. हा १९ लाखएवढे युनिट्सची वीजनिर्मिती या प्रकल्पातून होणार असून अंदाजे प्रतिवर्ष रक्कम ६० लाखाची बचत होणार आहे तसेच जिल्ह्यातील सर्व स्ट्रीटलाईटचे वीजबिल कमी होणार आहे. १ मेगावॅट क्षमतेच्या सौरप्रकल्पाचे अंदाजपत्रक व तांत्रिक मंजुरी महाऊर्जाकडून प्राप्त झाली आहे. ८ कोटी ३० लाख ६९ हजाराचा प्रकल्प आहे. प्रकल्प आस्थापित झाल्यास प्रकल्पाचा खर्च १३ ते १४ वर्ष या कालावधीतच भरून निघणार आहे. संरचना ही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पूर्णपणे स्वयंचलित असल्याने वीजबिलापोटी येणाऱ्या खर्चात मोठी बचत होणार आहे.

कोट
गोळप येथील सौरऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. महावितरणच्या उपकेंद्राशी जोडण्याचे अंतिम टप्प्यातील काम सुरू आहे. वीज खरेदी करार लवकरच करून राज्यासाठी पथदर्शी ठरणारा हा प्रकल्प लवकरच सुरू केला जाणार आहे.
- कीर्तीकीरण पूजार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.