पॉवर ट्रीलरवर झा़ड कोसळून सोनाळीत शेतकऱ्याचे नुकसान

पॉवर ट्रीलरवर झा़ड कोसळून
सोनाळीत शेतकऱ्याचे नुकसान
Published on

पॉवर टिलरवर झाड कोसळून
सोनाळीत शेतकऱ्याचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २ ः भातरोप पुनर्लागवड सुरू असलेल्या मळ्यात भले मोठे पिंपळाचे झाड वाऱ्यामुळे कोसळले. सुदैवाने भातरोप लागवड करीत असलेल्या कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र, पॉवर टिलरचे मोठे नुकसान झाले. हा प्रकार सोमवारी (ता. १) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडला. तालुक्यात भातरोप पुनर्लागवडीला वेग आला आहे. सोनाळी-चव्हाणवाडी येथील शेतकरी नामदेव राजाराम दर्पे यांची घराशेजारी असलेल्या शेतमळ्यामध्ये भातरोप लागवड सुरू आहे. सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ते पॉवर टिलरच्या सहाय्याने नांगरणी करीत होते. याचवेळी शेतमळ्याच्या बांधावर असलेले भले मोठे पिंपळाचे झाड अचानक मुळासकट उन्मळून पडले. त्यांनी लागलीच हातातील पॉवर ट्रीलर तिथेच सोडून बाजूला धाव घेतल्याने अनर्थ टळला. ते काही अंतरावर बाजूला गेल्यावर झाड शेतात पडले. या घटनेत पॉवर टिलरचे मोठे नुकसान झाले. या शेतमळ्याच्या बाजूला देखील काही शेतकरी काम करीत होते. सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही.
94401

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com