

सतीमध्ये शालेय
पुस्तकपेढी योजना
चिपळूण, ता. २ ः सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेड-चिंचघरी (सती) मध्ये नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकपेढीतर्फे पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. शासन परिपत्रकानुसार, २५ जून २०२४ पासून नवीन शैक्षणिक वर्ष २०२४ /२५ सुरू झाले आहे. या कनिष्ठ महाविद्यालयात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही पुस्तकपेढीमार्फत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांची बेताची परिस्थिती, तसेच होतकरू हुशार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यानुसार कला, वाणिज्य, शास्त्र या शाखेमधील लाभार्थी विद्यार्थ्यांना प्राचार्य संजय वरेकर यांच्या नियोजनानुसार पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. ही पाठ्यपुस्तके दीशान्तर संस्था चिपळूण व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध करून देण्यात आली. या पाठ्यपुस्तकांचा ८५ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. महाविद्यालयाच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तक वितरण ग्रंथालय प्रमुख जयंत पवार, प्राध्यापक सुरेश जगदाळे, प्राध्यापक राजेंद्र पवार, विमल शिगवण, अंजली दाभोळकर, राजेश भुवड, शुभांगी कदम, शशांक हळबे, सतीश पालकर यांच्या उपस्थितीत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.