लांजा तालुक्यात 12 जुलैपर्यंत शिबिरे

लांजा तालुक्यात 12 जुलैपर्यंत शिबिरे

Published on

लांजा तालुक्यात १२ जुलैपर्यंत शिबिरे
लांजा, ता. ३ः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लांजा तहसील कार्यालयात होणारी लोकांची गर्दी लक्षात घेता या योजनेसाठी ग्रामपंचायतस्तरावर शिबिर आयोजित करा, अशी मागणी भाजपचे तालुका सरचिटणीस शैलेश खामकर यांनी केली आहे. लांजा तहसील कार्यालयात उत्पन्न दाखला आणि अधिवास दाखल्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. सेतू कार्यालयात मोठी गर्दी झाल्याने या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तालुक्याच्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये या दाखल्यांसाठी शिबिरे लावण्यात यावीत, असे खामकर यांनी केली.
हे लक्षात घेऊन तहसीलदार प्रमोद कदम यांनी शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ४ जुलैला ग्रामपंचायत वेरवली बुद्रुक, ग्रामपंचायत पुनस, आंजणारी, ग्रामपंचायत मठ, ५ जुलैला ग्रामपंचायत आसगे व आडवली, ग्रामपंचायत झापडे, ८ जुलैला ग्रामपंचायत शिरवली, ९ ला ग्रामपंचायत वाडगाव, १० ला ग्रामपंचायत गोळवशी, ११ ला ग्रामपंचायत खावडी, १२ ला ग्रामपंचायत निओशी ईंदवटी याप्रमाणे महा ई-सेवा केंद्रांची नियुक्ती केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.