रत्नागिरी ः रत्नागिरी शहर खड्डेमय

रत्नागिरी ः रत्नागिरी शहर खड्डेमय

94438
94439
94440
94441
94442
94443

-----

रत्नागिरी शहर खड्डेमय
वाहनचालक संतप्त ; जांभ्या दगडाने खड्डे भरण्यास सुरवात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ः एप्रिल ते मे या दोन महिन्यात रत्नागिरी शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू आहे. साळवीस्टॉप, नाचणे, कोकणनगर या भागातील कामे पूर्ण झाली; मात्र शहराच्या मध्यवर्ती भागात मारूती मंदिर ते माळनाकापर्यंत जुन्या रस्त्यावर काँक्रिटीकरणासाठी पुन्हा डांबरीकरण करण्यात आले. हा रस्ता मुसळधार पावसात वाहून गेला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. शहरात दिवसाला हजारो वाहने या रस्त्यावरून फिरत असता. त्या वाहनचालकांना खड्ड्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था पाहून वाहनचालक ''सावधान'' पुढे खड्डे आहेत, असे म्हणत इतरांना सतर्क करत मार्गक्रमण करत आहेत.
जिल्ह्यात पावसाचा जोर आहे; परंतु रत्नागिरी शहरात रस्त्यांच्या कामामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. मारूती मंदिर, नाचणेरोड, साळवीस्टॉपकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. क्राँक्रिटीकरणाचा रस्ता वाहनचालकांसाठी चांगला आहे; पण उर्वरित परिसरात खड्ड्यांतून वाहने चालवताना धक्के खावे लागत आहेत. पुढील मारूती मंदिर ते माळनाका रस्त्याची अवस्था दयनीय आहे. मारूती मंदिर येथे दरवर्षी मंदिराच्या वळणावर पडणारा भलामोठा खड्डा यावर्षीही पडला. त्यामुळे वाहनचालकांना अदबीने वाहन चालवावे लागत आहे. मारूती मंदिर सर्कल ते माळनाका येथून वाहन चालवताना देवाचे नाव घेत प्रौढ वाहनचालक गाडी चालवताना दिसतात. या सगळ्याचा विचार करून पालिकेने मारूती मंदिर येथील खड्ड्यात जांभा डबर टाकला आहे; पण तोही उखडला आहे. माळनाक्यापर्यंत ''स्वर्गाचे दार कधी उघडेल,'' अशी अवस्था वाहनचालकांची झाली आहे. कोणता खड्डा चुकवावा, असा प्रश्न चालकांपुढे असतो. मारूती मंदिर ते माळनाका या रस्त्यावर वाहनचालकांनी वाहन सावकाश हाकावे, असा सल्ला दिला जात आहे. प्रशासनाकडून वेळीच याकडे लक्ष दिले असते तर ही वेळ आलीच नसती, असे नागरिकांचे म्हणणे आहे. पाऊस नसताना या खड्ड्यांची डागडुजी व्हावी, अशी केवळ अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com