‘सह्याद्री’तर्फे आयोजित कृषी सहलीस प्रतिसाद

‘सह्याद्री’तर्फे आयोजित कृषी सहलीस प्रतिसाद
Published on

‘सह्याद्री’च्या कृषी सहलीस प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः अलिकडेच स्थापन सह्याद्री कृषी पर्यटन सहकारी सेवा संस्थेने कृषी पर्यटनास चालना देण्यासाठी एतिहासिक गड व किल्ले दर्शनाचा कृषी पर्यटन सहलीमध्ये समावेश केला आहे. संस्थेच्यावतीने पहिली कृषी पर्यटन सहल २९ मेस नुकतीच माणगांव नारूर रांजणागड येथे झाली. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सह्याद्री कृषी संस्थेचे अध्यक्ष रामानंद शिरोडकर, संचालक जोश कन्नार्ट, कन्नाई अ‍ॅग्रो टुरीझम सेंटरचे चालकमालक व सावंत फार्मचे चालक मालक मुक्ता सावंत, सौ. विभावरी सुकी, भरत गावडे व सभासद, जिल्ह्यातील पर्यटक असे १७ पर्यटक सहभागी झाले होते. नारुर येथील श्री महालक्ष्मीचे दर्शन घेऊन रांजणागड मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी नारुर येथील माजी सरपंच दीपक नारकर आदींनी उपक्रमाचे कौतुक केले. सहलीमध्ये २५ वर्षांचे युवक, युवतींसह ७० व ७५ वर्षांचे ज्येष्ठ कृषी बागायतदार सहभागी झाले होते. सहभागींनी गडाच्या पाहणीनंतर थोडीशी विश्रांती घेऊन परतीचा प्रवास पूर्ण करून पुढील टप्प्यासाठी मार्गाक्रमण केले. पुढील टप्पा हिर्लोक येथील ‘मामाचो गाव’ या सावंत यांच्या मालकीच्या कृषी पर्यटन केंद्रास भेट हा होता. दुपारचे जेवण व थोड्या विश्रांतीनंतर मामाचे गाव कृषी पर्यटन स्थळातील साईमंदिर, बालोद्यान, स्वीमींग टँक व केंद्रातील सर्व क्षेत्राची पाहणी झाल्यानंतर पुढील प्रवास सुरू झाला. अनंत सावंत यांनी खूपच कल्पकतेतून व भरपूर गुंतवणूक करून सुमारे चार ते साडेचार एकरात विस्तीर्ण कृषी पर्यटन केंद्र उभारले आहे. त्यांचे उपस्थितांनी कौतुक केले. सहलीचा शेवटचा टप्पा पिंगुळी येथील पद्मश्री गणपत म्हसगे, गुढीपूर यांच्या लोककला संग्रहालय, कळसुत्री बाहुल्यांचा खेळ (पॅपेट शो). पर्यटन क्षेत्रात भेट देवून संपूर्ण लोककला म्युझियम पाहून झालो. म्युझियमचे मालक श्री मसगे यांची कृषी पर्यटकांचे स्वागत करून सर्व दालनांची सुमारे १ तास पाहणी करून माहिती दिली, याबद्दल सहीतील सहभागींनी कृष्णा म्हसगे यांचे आभार मानले.
94515

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.