सिंधुदुर्गातील काजू बीला योग्य भाव द्या

सिंधुदुर्गातील काजू बीला योग्य भाव द्या

सिंधुदुर्गातील काजू बीला योग्य भाव द्या

गोवा कृषिमंत्र्यांना साकडे ः शेतकरी संघटनेने घेतली भेट

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः जिल्ह्यातील शेतकरी आणि फळ बागायतदार यांच्या काजू बीला योग्य भाव मिळावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते तथा माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी गोव्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांची शेतकरी आणि फळबागायतदार संघ सावंतवाडी व दोडामार्ग या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह गोवा मंत्रालयामध्ये भेट घेत मार्गदर्शन घेतले.
गोवा राज्यामध्ये काजू बियाण्याला प्रति किलो १५० रुपये भाव सध्या शेतकऱ्यांना देण्याची शासकीय योजना कृषी मंत्रालयामार्फत गोव्यात सुरू आहे. यापुढे जाऊन गोवा राज्य कृषी मंत्रालय प्रति किलो १७० रुपये दर काजू उत्पादकाला मिळावा, या दृष्टीने प्रस्ताव आगामी गोवा राज्याच्या अधिवेशनामध्ये मांडला जाईल व त्याला मंजुरी मिळेल, असे कळते, असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विलास सावंत म्हणाले.
यावेळी विलास सावंत, गोवा राज्य कृषी सचिव मंदार शिरोडकर, कृषी संचालक संदीप फळ देसाई, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी दिवाकर म्हावळणकर, खजिनदार, अशोक सावंत उपाध्यक्ष दोडामार्ग शेतकरी, आकाश नरसूले, संजय देसाई अध्यक्ष दोडामार्ग शेतकरी संघ, पुंडलिक दळवी तालुकाध्यक्ष सावंतवाडी, योगेश कुबल तालुकाध्यक्ष वेंगुर्ला, विवेक गवस विधानसभा युवक अध्यक्ष, ऋतिक परब विद्यार्थी अध्यक्ष, मनोज वाघमोरे आदी उपस्थित होते.
---
मग महाराष्ट्रातही दर मिळावा!
गोवा राज्यात एवढा चांगला दर काजू उत्पादकाला मिळत असेल, तर मग महाराष्ट्रात तसाच दर मिळावा, यासाठी लवकरच महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची मुंबई येथे या अधिवेशनामध्ये भेट घेऊन काजू उत्पादक शेतकऱ्याला योग्य भाव मिळावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे सावंतवाडी दोडामार्ग शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विलास सावंत यांनी स्पष्ट केले.
94520

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com