जिल्ह्यात शासकीय वसतिगृहांत 
प्रवेशास विद्यार्थ्यांना आवाहन

जिल्ह्यात शासकीय वसतिगृहांत प्रवेशास विद्यार्थ्यांना आवाहन

Published on

जिल्ह्यात शासकीय वसतिगृहांत
प्रवेशास विद्यार्थ्यांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३ : सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयांतर्गत मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली व वेंगुर्ले अशा तीन ठिकाणी तसेच मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ले व देवगड अशा पाच ठिकाणी आहेत. या आठ शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींना २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्गीयांसह इतर प्रवर्गांच्या आठवी, अकरावी, व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये रिक्त असणाऱ्या जागेवर विनामूल्य प्रवेश ऑफलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबतचे अर्ज संबंधित तालुक्याच्या वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडून प्राप्त करून आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत. शासकीय वसतिगृहात विनामूल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम व इंटरनेट वाय-फाय, आदी सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतात. इच्छुक विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावरील शासकीय वसतिगृहाचे गृहपाल किंवा सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.