वेंगुर्ले बंदर दुर्घटनेमधील 
मृतांच्या कुटुंबियांना मदत

वेंगुर्ले बंदर दुर्घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांना मदत

Published on

वेंगुर्ले बंदर दुर्घटनेमधील
मृतांच्या कुटुंबीयांना मदत

केसरकरांकडून प्रत्येकी ५० हजार

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ३ : वेंगुर्ले बंदर येथे २३ मे रोजी रात्री वादळी वाऱ्यांमुळे छोटी होडी बुडून झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या चार जणांच्या कुटुंबीयांना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मदतीचा हात दिला. केसरकर यांनी आपल्या स्वखर्चातून या चारही जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा धनादेश त्यांच्या बँक खात्यात जमा केला.
यातील तीन खलाशी परराज्यांतील असूनही मंत्री केसरकर त्यांच्या मदतीसाठी सरसावले असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. याबाबतची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी दिली. वेंगुर्ले बंदर येथे झालेल्या घटनेत रत्नागिरी येथील महादेव शंकर आंबेरकर, मध्यप्रदेश येथील खलाशी आझान मुनीलाला कोल, चाँद गुलाम महम्मद, शिवराम कोल यांचा मृत्यू झाला होता. या होडीचे मालक दाभोसवाडा येथील बाबी रेडकर यांची शिक्षणमंत्री केसरकर यांनी भेट घेत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंत्री केसरकर यांनी स्वखर्चातून या चारही खलाशांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली असल्याचे मांजरेकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.