कासार्डेत कृषिदूतांकडून
विद्यार्थ्यांना शेतीचे धडे

कासार्डेत कृषिदूतांकडून विद्यार्थ्यांना शेतीचे धडे

Published on

कासार्डेत कृषिदूतांकडून
विद्यार्थ्यांना शेतीचे धडे

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २ : ब्राह्मणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ अंतर्गत (कै.) राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील कृषिदूतांनी ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कासार्डे येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषिदिन साजरा केला.
यानिमित्त वृक्षारोपणासह वृक्ष दिंडी काढण्यात आली. ग्रामपंचायतीतर्फे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात कृषिदूतांनी शालेय मुलांसोबत वृक्षदिंडीमध्ये सहभाग घेतला. कृषिदूतांनी जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण केले. यावेळी शालेय मुलांना शेतीचे महत्त्व पटवून दिले. श्रीनाथ पाटोळे, अमृत पाटील, प्रीतम शेळके, राज नाईक, प्रतीक नरुटे, श्रेयस जोंग, विजय पडवळकर, जे. हरिश, राजेंद्र रेड्डी, आशिष उपाध्ये या विद्यार्थ्यांनी शालेय मुलांना मार्गदर्शन केले. त्यांना महाविद्यालयाचे प्रा. पंकज संते, प्रा. सुशीलकुमार मोटे, प्रा. किरण भोकरे, डॉ. रोहित शेलार, प्रा. स्वाती पाटणकर, डॉ. लक्ष्मण व्यवहारे, प्रा. रुपाली ढोले, प्रा. प्रदीक्षा गावकर, प्रा. रजनी किल्लेदार, प्रा. कविता पुजारी, प्रा. निकिता लांडगे यांचे मार्गदर्शन लाभले.
94522

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.