राजापूर - जिल्ह्यात मोहीम राबवा ः यशवंतराव

राजापूर - जिल्ह्यात मोहीम राबवा ः यशवंतराव

Published on

उत्पन्नाचे दाखले देण्यासाठी
मोहीम राबवाः यशवंतराव
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३ः लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्याला प्रस्तावासोबत उत्पन्नाच्या दाखल्यासह अन्य विविध दाखले जोडावे लागणार आहेत. आवश्यक दाखले देण्यासाठी प्रशासनाकडून वेगाने कार्यवाही करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेसाठी अर्ज भरण्याला सुरवात झाली असून, ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. या योजनेच्या परिपूर्ण प्रस्तावासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, महाराष्ट्र रहिवासी दाखला, बँक पासबुक, फोटो या कागदपत्रांसोबत उत्पन्नाचा दाखला अनिवार्य आहे. त्यामुळे उत्पन्नाचे दाखले मिळवण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिलांना उत्पन्नाचे दाखले प्रशासनाकडून फास्ट ट्रॅकवर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी यशवंतराव यांनी केली आहे. फास्ट ट्रॅकवर दाखले मिळण्यासाठी आवश्यक असलेली प्रभावी संसाधने, मनुष्यबळ आणि व्यवस्था स्थानिक पातळीवर उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.