सह्याद्रीने सामान्यांच्या मुलांना संधी दिली

सह्याद्रीने सामान्यांच्या मुलांना संधी दिली

Published on

94497

सह्याद्रीने सामान्यांच्या मुलांना संधी दिली
मोहन पाडावे ; दहावी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३ः सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलने सोलगावसारख्या भागातील सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे केलेले कार्य आणि प्रशालेने राखलेली गुणवत्ता निश्‍चितच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रीय कबड्डी पंच मोहन पाडावे यांनी काढले.
सोलगाव येथील सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पालक-शिक्षक सभेत झालेल्या दहावी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी नवजीवन कॉलेजचे प्राचार्य राजेंद्रकुमार व्हनमाने, प्रा. प्रितम सुर्वे या प्रमुख पाहुण्यांसह प्रशालेचे मुख्याध्यापक दिनेश चौगुले आणि शिक्षकवृंद उपस्थित होते. नियोजनबद्ध प्रयत्नांनी निश्‍चित केलेले ध्येय साध्य करा, असा सल्ला या प्रसंगी पाडावे यांनी दिला तसेच प्राचार्य व्हनमाने यांनी दहावी परीक्षेसह अन्य विविधांगी परीक्षेत संपादीत केलेल्या लक्षवेधी यशाबद्दल विद्यार्थी, शिक्षक यांचे विशेष कौतुक केले. त्यांनी दहावीतील ९० टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थ्यांना पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. दहावी परीक्षेमध्ये प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी, कार्यक्रमाची सुरवात शिक्षण अन् सहकार महर्षी स्व. गोविंदराव निकम यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.