पाट प्रशालेत विद्यार्थ्यांना
शैक्षणिक साहित्याचे वाटप

पाट प्रशालेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Published on

पाट प्रशालेत विद्यार्थ्यांना
शैक्षणिक साहित्याचे वाटप

सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ३ ः एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी, पाट संचलित एस. एल. देसाई विद्यालय व (कै.) एस. आर. पाटील कनिष्ठ महाविद्यालय व इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध दानशूर व्यक्तींनी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
संस्था पदाधिकारी राजेश सामंत व रत्नागिरी येथील कृषी अधिकारी गणेश जुवळे, ऋणानुबंध संस्थेच्या प्रतिनिधी चित्रा नेरुरकर यांच्या हस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले. ऋणानुबंध संस्थेतर्फे पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वह्या, अजित रावले यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना ५० छत्र्या, मुंबई स्थित मोरया कन्स्ट्रक्शन व्यावसायिक शशांक परब व बाळकृष्ण परब यांच्यातर्फे गणवेश व दप्तरे, राधारंग फाउंडेशन व नाईक कुटुंबीयांमार्फत वह्या या सर्व शैक्षणिक साहित्याचे वाटप विद्यालयातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी संस्था सदस्य राजेश सामंत, कृषी अधिकारी गणेश जुवळे, ऋणानुबंध संस्थेच्या प्रतिनिधी चित्रा नेरुरकर, प्रशालेचे मुख्याध्यापक राजन हंजनकर, पर्यवेक्षक सयाजी बोंदर, ज्येष्ठ शिक्षक संदीप साळसकर, शिक्षक प्रतिनिधी तानाजी काळे उपस्थित होते. संदीप साळसकर यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक सयाजी बोंदर यांनी आभार मानले.
94569

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.