अंतराळातील ब्लॅक होलबाबत संशोधन करायला आवडेल

अंतराळातील ब्लॅक होलबाबत संशोधन करायला आवडेल

94495

अंतराळातील ब्लॅक होलबाबत
संशोधन करायला आवडेल
शर्वरी काळे : गुजराळी शाळेत हृदय सत्कार
राजापूर, ता. ३ः अमेरिकेतील नासाभेटीचा आनंद आणि अनुभव अवर्णनीय होता. अंतराळामध्ये असलेले ब्लॅकहोल, तेथील विविध गोष्टी स्वतःकडे आकर्षित करत असल्याची माहिती वाचनात आली आहे. नासामध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करण्याची भविष्यात संधी मिळाल्यास अंतराळातील या ब्लॅकहोलसंबंधी संशोधन करायला निश्‍चितच आवडेल, असे शर्वरी काळे हिने सांगितले.
नासा, इस्रो भेट दौऱ्यानंतर शाळेच्यावतीने गुजराळी येथील जिल्हा परिषद शाळेत तिचा सत्कार करण्यात आला. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल करंबेळकर, व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मधुरा धुमक, सदस्य मनोज पवार, केंद्रप्रमुख अनिल जायदे, मुख्याध्यापक मनीषा विचारे, सौ. कदम, सौ. देसाई आदी उपस्थित होते. या प्रसंगी शर्वरीने नासाभेटीचा सविस्तर वृत्तांत सांगितला. नासासंबंधी माहिती मिळताना युट्युबवरील व्हिडिओंच्या माध्यमातूनही माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा उपयोग प्रत्यक्ष नासाभेट आणि पाहणीवेळी झाला. तेथील केनडी स्पेस सेंटरसह अंतराळ यान पाठवण्याचे ठिकाण, चंद्रावरून आणलेला दगड, यांनाच्या विविध प्रतिकृती, एटीएक्स जवळून पाहिला. थ्रीडीच्या माध्यमातून अंतराळवीर म्हणून अवकाशातून अप्रत्यक्षरित्या फिरून येण्याची संधीही मिळाली. जिल्हा परिषदेने राबवलेल्या या उपक्रमामुळे अनेक मुलांना नासा, इस्रो अनुभवण्याची संधी मिळाली असून हा उपक्रम भविष्यामध्ये सुरू ठेवावा, असे शर्वरीने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com