मिरजोळीत रस्त्याची दुरुस्ती तातडीने सुरू

मिरजोळीत रस्त्याची दुरुस्ती तातडीने सुरू

Published on

94617

मिरजोळीत रस्त्याची दुरुस्ती तातडीने सुरू
सदानंद चव्हाणांच्या सूचना; पावसाळ्यानंतर डांबरीकरण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ः गुहागर-चिपळूण महामार्गावरील मिरजोळी येथे मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा येऊन वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे येथील वाहनचालक, रिक्षामालक-चालक यांनी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार सदानंद चव्हाण यांना याबाबत माहिती देऊन सदर ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत मागणी केली. याप्रकरणी सदानंद चव्हाण यांनी त्या ठिकाणी भेट देऊन राष्ट्रीय महामार्ग विभागाचे संबंधित अधिकारी यांना प्रत्यक्षस्थळी बोलावून रस्त्याची दुरवस्था व वाहनचालक यांना होणारी गैरसोय लक्षात आणून देत रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला तातडीने सुरुवात करण्याच्या सूचना केल्या.
महामार्ग असतानाही मोठ्या प्रमाणात खड्डे पडूनही त्याकडे महामार्ग विभागाने लक्ष न दिल्याबद्दल माजी आमदार चव्हाण यांनी नाराजी व्यक्त करून हे खड्डे तातडीने भरून रस्ता वाहतुकीयोग्य करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्गाचे उपस्थित अधिकारी पुळेकर यांना दिल्या, तसेच पावसाळ्यानंतर या ठिकाणी डांबरीकरणाचे काम करून घेण्याबाबत प्राधान्याने कार्यवाही करण्यात यावी, असे सांगितले. त्याप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग विभागाने दखल घेत रस्त्याची तातडीने दुरुस्ती सुरू केली व पावसाळ्यानंतर पूर्णपणे डांबरीकरण करून घेण्यात येईल, असे सांगितले. रस्त्याची दुरुस्ती तातडीने सुरू झाल्याबद्दल वाहनचालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
या वेळी मिरजोळी सरपंच कासम दलवाई, उपसरपंच विनोद पवार, शिवसेना उपशहरप्रमुख अंकुश आवले, विकी लवेकर, सचिन हातीसकर, इब्राहिम खान, भाऊ भाटकर, राकेश देवळेकर, अभी बुरटे, अमोल देसाई उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.