महिलेचा विनयभंगप्रकरणी युवकाला ३ वर्षाचा कारावास

महिलेचा विनयभंगप्रकरणी युवकाला ३ वर्षाचा कारावास

Published on

विनयभंगप्रकरणी
तरुणास ३ वर्षे कारावास
संगमेश्वर, ता. ३ ः महिलेचा विनयभंग करून धक्काबुक्की करून त्याबाबत कोणाला सांगितलेस तर ठार मारण्याची धमकी देणाऱ्या युवकाला न्यायालयाने तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. धामणी-सोनारवाडी येथील सतीश विठोबा चव्हाण (वय ३०) असे आरोपीचे नाव आहे. संशयित युवकाने २०२१ मध्ये महिलेचा विनयभंग करीत धक्काबुक्की केली होती, तसेच ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी संगमेश्वर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षकांसह सध्याच्या पोलिस निरीक्षक स्मिता सुतार, तसेच तत्कालीन हवालदार संतोष झापडेकर, हवालदार एस. एस. कामेरकर यांनी तपास केला. २०२१ मध्ये आरोपी सतीश विठोबा चव्हाण याला संगमेश्वर पोलिसांनी न्यायालयात हजर केले. याप्रकरणी न्यायालयाने आरोपी सतीश चव्हाण याला काल गुन्हेप्रकरणी साडेतीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.