दिव्यांग दीपाली आईर यांचे
सिंधुदुर्गनगरी येथे उपोषण

दिव्यांग दीपाली आईर यांचे सिंधुदुर्गनगरी येथे उपोषण

दिव्यांग दीपाली आईर यांचे
सिंधुदुर्गनगरी येथे उपोषण

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३ ः घर परिसरातील कंपाउंडमधील पिण्याच्या पाण्याच्या वायरसह सांडपाण्याच्या पाईपचे नुकसान केल्याप्रकरणी वेळोवेळी प्रशासनाकडे अर्ज करून दखल न घेतल्याने वयोवृद्ध व दिव्यांग असलेल्या दीपाली भिकाजी आईर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.
देवगड तालुक्यातील मावळुंगे-देवळेकरवाडी येथील दीपाली आईर यांनी न्याय प्रश्नाबाबत २६ जानेवारीला उपोषण केले होते; परंतु अजूनही कोणताही न्याय मिळाला नाही. त्यांनी वारंवार याबाबत तक्रारी केल्या. त्या डोळ्याच्या उपचारासाठी मुंबईला गेल्या असता, अज्ञाताने घराच्या कंपाउंडमधील सांडपाण्याचा पाईप तसेच पिण्याच्या पाण्याची वायर कापून नुकसान केले. पदाचा गैरवापर करून अशा प्रकारचे निर्णय घेऊन माझ्यासारख्या अंध, अपंग वृद्धेवर अन्याय केला जात आहे, असा आरोप करीत आईर यांनी विजयदुर्ग पोलिस अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदने दिली. संबंधित पदाधिकाऱ्यांना कायद्याचा धाक नसून, आम्हाला वारंवार त्रास दिला जात आहे. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून योग्य दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
94649

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com