अतिजोखमीच्या भागात धूर फवारणी करावी

अतिजोखमीच्या भागात धूर फवारणी करावी

94581

अतिजोखमीच्या भागात
धूर फवारणी करावी
लांजा नगरपंचायतीकडे मागणी; नगरसेवक आक्रमक
लांजा, ता. ३ः लांजा नगरपंचायत हद्दीतील अतिजोखमीच्या कार्यक्षेत्रात धूर फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका पूर्वा मुळे व नगरसेवक राजेश हळदणकर यांनी केली असून, याबाबतचे निवेदन लांजा नगरपंचायत तसेच तहसीलदार यांना सादर करण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, सध्या पावसाला सुरवात झाली असून डेंगी व अन्य साथीच्या आजारांचा फैलाव होण्याची भिती आहे. या पार्श्वभूमीवर लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील अतिजोखमीच्या कार्यक्षेत्रात मच्छर आणि उपद्रवी कीटकांचा उपद्रव वाढीस लागणार नाही यासाठी धूर फवारणी करण्यात यावी, याकरिता लांजा नगर पंचायतीला निवेदन दिले होते; परंतु या निवेदनाला आठवडा उलटून गेला तरी लांजा नगर पंचायतीकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे लांजा नगर पंचायत यादृष्टीने गांभीर्याने पाहात नसल्याचे दिसून येत आहे आणि त्यामुळे डेंगीसदृश रुग्ण लांजा नगरपंचायत हद्दीत आढळूनही उपाययोजना करताना नगरपंचायत, आरोग्य विभाग, तालुका आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे आणि म्हणूनच या संभाव्य रोगाचा फैलाव होण्याच्या अगोदर याबाबत नगरपंचायत कार्यक्षेत्रात धूर फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका मुळे यांनी केली आहे. या वेळी नगरसेवक राजेश हळदणकर तसेच पप्पू मुळे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी दाजी गडहिरे, बाबा धावणे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com