लांजा-दाभोळे मार्गावरील चिरे वाहतूक बंद करा

लांजा-दाभोळे मार्गावरील चिरे वाहतूक बंद करा

Published on

लांजा-दाभोळे मार्गावरील
चिरे वाहतूक बंद करा
तहसीलदारांना निवेदन अन्यथा शुक्रवारी आंदोलन
लांजा, ता. ३ः पावसाळ्यात सुरू असणाऱ्या चिरे वाहतुकीमुळे लांजा-दाभोळे मार्गाची पूर्णपणे वाताहात झाली असून, या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहेत. त्यामुळे लांजा-दाभोळे मार्गावर अवजड वाहनातून सुरू असलेली चिरे वाहतूक तत्काळ बंद करा, अशी मागणी लांजा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) युवक तालुकाध्यक्ष चंद्रशेखर धावणे आणि पदाधिकारी दाजी गडहिरे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन निवासी नायब तहसीलदारांना देण्यात आले. तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाळ्यात चिरेखाणी सुरू आहेत. या चिरेखाणीतून मोठ्या प्रमाणात १६ टायर ट्रक अवजड वाहनांद्वारे चिरे वाहतूक केली जात आहे. सध्या पडणाऱ्या पावसाचा विचार करता या अवजड वाहतुकीमुळे लांजा-दाभोळे मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढीस लागले आहे, तसेच लांजा-दाभोळे रस्त्याचा विचार करता एवढी अवजड वाहतूक या रस्त्यावरून केली जाऊ शकत नाही. सर्व चिरे उत्खनन हे सापुचेतळे येथून होत आहे. सर्व वाहतूक ही देवधेफाटा येथून लांजाकडे न येता पालीमार्गे वळवावी, अशी मागणी केली आहे. चिरेखाण मालक आणि चिरे वाहनधारक यांना सूचना करून मध्यरात्रीपासून वाहतूक बंद करण्यात यावी. याबाबत कार्यवाही न‌ झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (ता. ५) सकाळपासून वाहतूक बंद करू, असा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.