‘सावंतवाडी अर्बन’ अडचणीत
आणणाऱ्यांची यादी जाहीर करा

‘सावंतवाडी अर्बन’ अडचणीत आणणाऱ्यांची यादी जाहीर करा

Published on

‘सावंतवाडी अर्बन’ अडचणीत
आणणाऱ्यांची यादी जाहीर करा

ॲड. पराडकर ः परुळेकरांच्या आरोपांचे समर्थन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः सावंतवाडी अर्बन बॅंक अडचणीत आणण्यात कारणीभूत ठरलेल्यांच्या नावांची यादी जाहीर व्हायला हवी, अशा आशयाचे पत्रक येथील अॅड. श्रीधर पराडकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे. सावंतवाडी अर्बन अडचणीत येण्यास दीपक केसरकर समर्थक कारणीभूत असल्याचा आरोप डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला होता. याचे समर्थन करणारे पत्रक अॅड. पराडकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, वामनराव कामत यांच्या कारकिर्दीत बॅंक भरभराटीत होती. जिने त्या दरम्यान खातेदारांना, सभासदांना चांगला परतावा दिला, ती बॅंक विदयमान पदाधिकाऱ्यांच्या कारकिर्दीत एकदम सपाट कशी झाली? त्यांच्याकडे असलेले पैसेही वेळेवर मिळत नाहीत. या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? ते पैसे केव्हा मिळणार? हेही ठेवीदारांना सध्याचे चेअरमन व संचालक सांगत नाहीत. अशा परिस्थितीत बॅंकेकडून कोणी कोणी कर्जे घेतली व बॅँकेच्या कर्जवसुली अधिकाऱ्यांनी काय काम केले, हेही बाहेर यायला हवे. बॅंक बुडविणाऱ्यांच्या नावांची यादी प्रसिद्ध होणे गरजेचे आहे. १९४५ पासून वैभव असलेल्या अर्बन बॅंकेच्या ज्वलंत प्रश्नाला डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी वाचा फोडली असल्याचेही यात नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.