प्रदीप गमरे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी बढती

प्रदीप गमरे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी बढती

Published on

प्रदीप गमरे यांची
उपनिरीक्षकपदी बढती
गुहागर, ता. ४ : तालुक्यातील मुंढर गावचे सुपुत्र प्रदीप गमरे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची पोलिस खात्यात झुंझार पोलिस म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक गुन्ह्यांचा तपास उलगडून त्यांनी पोलिसखात्याचे नाव उज्ज्वल केले. जिल्ह्यातील मंडणगड, खेड, रामपूर, चिपळूण, सावर्डे या पोलिस ठाण्यात यशस्वी कामगिरी केली आहे. अनेक गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना जेरबंद केले. सध्या ते सावर्डे पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. पोलिस खात्यात सेवा सुरू झाल्यानंतर हवालदार, हेडकॉन्स्टेबल, पोलिस अंमलदार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ते पोलिस उपनिरीक्षक, असा त्यांचा प्रवास आहे. अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात त्यांचा हातखंडा आहे. भेदक नजरेने आरोपी पकडण्याची त्यांची पद्धत असाधारण आहे. त्यांच्या यशोमय प्रगल्भतेचा विजय म्हणून मागील वर्षी महाराष्ट्र पोलिस खात्यातील पोलिस महासंचालक पदकाने गौरवण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.