‘समर्थ भंडारी’तर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार

‘समर्थ भंडारी’तर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार

Published on

‘समर्थ भंडारी’तर्फे
विद्यार्थ्यांचा सत्कार
गुहागरः श्री समर्थ भंडारी पतसंस्थेच्या ज्ञानरश्मी वाचनालय येथील डॉ. तानाजीराव चोरगे सभागृहात दहावी, बारावी, शिष्यवृत्ती व इतर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांनी शिक्षणाने माणूस संस्कृत बनतो. समाजाचा विकास होतो. तुम्ही शिकलात तर आपल्या गावाचा विकास होईल. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केल्यास पुढील शिक्षणासाठी त्यांच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल, असे सांगितले. कार्यक्रमाला श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका स्मिता आरेकर, पराग आरेकर, भंडारी समाजाचे खजिनदार तुषार सुर्वे, नीलेश मोरे, श्रीधर बागकर उपस्थित होते.
-----------
देवरूखात डॉक्टरांचा
वृक्षभेट देऊन सन्मान
साडवलीः डॉक्टर्स डे निमित्त देवरूखमधील डॉक्टरांचा वृक्षभेट देऊन सन्मान करण्यात आला. आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा काम करणारे वैद्यकीय अधिकारी यांना डॉक्टर दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवती नेत्या सई निकम, महिला तालुकाध्यक्ष मानसी करंबेळे, तालुका संघटक बाळू ढवळे, युवक तालुकाध्यक्ष पंकज पुसाळकर, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड, माजी नगरसेविका प्रेरणा पुसाळकर आदी उपस्थित होते.
--------------
मादक द्रव्य सेवन
विरोधी दिन साजरा
गुहागर : येथील खरे-ढेरे–भोसले महाविद्यालयाच्या इतिहास व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने छत्रपती शाहू महाराज जयंती व आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य पद्मनाभ सरपोतदार, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. आनंद कांबळे, इतिहास विभागप्रमुख रश्मी आडेकर उपस्थित होते. जागतिक पातळीवर १९८९ पासून अखिल मानवजातीमध्ये जागृती करून सर्व प्रकारच्या मादक द्रव्याच्या सेवनापासून दूर राहणे व निरोगी जीवन जगणे हा उदात्त हेतू आहे. आडेकर यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याच्या आढावा घेतला. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात असलेली दर्जा व संधीची समानता, सामाजिक, आर्थिक न्याय आदी उद्दिष्टांची अंमलबजावणी छत्रपती शाहू महाराजांनी केल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी शपथ देण्यात आली.
-------
पिकविम्यासाठी युनायटेड
इंडिया कंपनीची नियुक्ती
चिपळूण ः रत्नागिरी जिल्ह्यासाठी सन २०२४-२५ पिकविमा भरण्यासाठी युनायटेड इंडिया कंपनीची नियुक्ती केली आहे. चिपळूण तालुक्यातील भात व नागली ही पिके अधिसूचित करण्यात आली आहेत. या पिकांचा प्रधानमंत्री पिकविमा योजना खरीप हंगामासाठी प्रतिअर्ज एक रुपयात पिकविमा भरून पिकविमा पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे. पिकविम्याची रक्कम १५ जुलैपर्यंत भरता येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी पिकविम्याची रक्कम १५ जुलैपूर्वीच भरावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे यांनी केले आहे.

-------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.