यशवंतराव भोसले फार्मसी 
कॉलेजचा निकाल ९६ टक्के

यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचा निकाल ९६ टक्के

Published on

९४७९७

यशवंतराव भोसले फार्मसी
कॉलेजचा निकाल ९६ टक्के
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः मुंबई विद्यापीठाचा बी. फार्मसी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा निकाल ९६ टक्के एवढा लागला आहे. बी. फार्मसी फायनल इयर परीक्षेसाठी कॉलेजमधून एकूण१२९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये गिरीश गावडे (८.९१) याने प्रथम, विद्याधर
वाजे (८.७३) याने द्वितीय, तसेच प्रांजल गवळी, तेजस्वी कडू, वंशिता पाटील व तेजस वाडेकर या सर्वांनी ८.५५ पर्सेंटाईल गुण मिळवत संयुक्तपणे तृतीय क्रमांक प्राप्त केला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले,
प्राचार्य डॉ. विजय जगताप, परीक्षा विभागप्रमुख नमिता नार्वेकर व प्रणाली जोशी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.