नव्या तंत्रज्ञानातून शेतीतून आर्थिक सुबत्ता साधा

नव्या तंत्रज्ञानातून शेतीतून आर्थिक सुबत्ता साधा

Published on

९४७४९

नव्या तंत्रज्ञानातून शेतीतून आर्थिक सुबत्ता साधा
तुकाराम जाधव ः शेतकरी, ग्रामसेवक, रोजगार सेवकांचा सत्कार

राजापूर, ता. ४ ः कृषी क्षेत्रातील आधुनिक आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत शेतकर्‍यांनी शेतीच्या माध्यमातून आपली आर्थिक सुबत्ता साधावी, असे आवाहन गटविकास अधिकारी तुकाराम जाधव यांनी केले. जागतिक कृषिदिनाचे औचित्य साधून प्रगतशील शेतकरी, पीक स्पर्धा विजेते शेतकरी, एमआरजीएसमध्ये उत्कृष्ट काम करणारे ग्रामसेवक व रोजगार सेवक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पंचायत समिती आणि तालुका कृषी कार्यालयातर्फे ओणी येथील गजानन मंगल कायार्लयात कृषिदिन साजरा करण्यात आला. या वेळी सहाय्यक गटविकास अधिकारी परेश सुर्वे, तालुका कृषी अधिकारी दादासाहेब झेंडे, नायब तहसीलदार श्रीमती गुरव, सरपंच श्रीमती भाबळे आदी उपस्थित होते. गटविकास अधिकारी जाधव यांनी शेतकर्‍यांनी कृषीविषयक शासनाच्या असलेल्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपले जीवनमान सुधारण्याचे आवाहन केले. या निमित्त वृक्षारोपण करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश सार्‍यांना देण्यात आला. खरवते येथील प्रगतशील शेतकरी दयानंद चौगुले यांनी विकसित केलेल्या देशी वाण प्रक्षेत्रावरही भेट देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.