विकासकाने केलेले अतिक्रमण पालिकेने हटविले

विकासकाने केलेले अतिक्रमण पालिकेने हटविले

विकासकाचे अतिक्रमण हटविले
संरक्षक भिंत जमीनदोस्त ः नगरपालिकेच्या हद्दीवरून नवीन भिंत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : नगरपालिकेने आरक्षित भूखंड विकासकाला दिल्यावर त्या जागेवर पालिकेला सुसज्ज असा दवाखाना विकासकाने बांधून दिला आहे; परंतु विकासकाने सव्वामीटर पालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून संरक्षक भिंत उभी केली होती. पालिकेने ही भिंत तोडली असून, पालिका हद्दीवरून नवीन संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. चार वर्षांनंतर ही बाब पालिकेच्या लक्षात आल्यानंतर पालिकेने ही संरक्षक भिंत जमीनदोस्त केली.
रत्नागिरी नगरपालिकेची मजगाव रोडला मोठी आरक्षित जागा आहे. ही जागा विकासक पवार यांना देण्यात आली. पालिकेला काही जागा सोडून त्यावर दोन मजली इमारतीचा सुसज्ज दवाखाना बांधून देण्याच्या अटीवर ही जागा दिली होती. त्यानुसार विकासकाने सुसज्ज दवाखाना बांधून दिला आहे; परंतु पालिकेच्या हद्दीमध्ये विकासकाने सुमारे सव्वामीटरच्या जागेत अतिक्रमण करून संरक्षिक भिंत उभारली होती.
कोरोना काळातदेखील या दवाखान्याचा चांगलाच उपयोग झाला. अनेकांवर तेथे उपचार करण्यात आले होते; परंतु पालिका मालमत्ता विभागाने जेव्हा या जागेची पाहणी केली तेव्हा पालिकेच्या जागेमध्ये विकासकाने सव्वामीटर अतिक्रमण केल्याचे लक्षात आले. पालिकेने तत्काळ जेसीबीने हे अतिक्रमण जमिनदोस्त केले. आत विकासक आणि पालिकेच्या मालकीच्या जागेच्या हद्दीवर नव्याने संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. पालिका प्रशासनाने याला दुजोरा देत अतिक्रमण केले असल्याने ते आम्ही हटविल्याचे सांगितले.


९४८०६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com