दोन मालवाहू टेम्पोंना
इन्सुली घाटीत अपघात

दोन मालवाहू टेम्पोंना इन्सुली घाटीत अपघात

Published on

94829
94852


दोन मालवाहू टेम्पोंना
इन्सुली घाटीत अपघात

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ४ ः जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली घाटीत आज दोन टेम्पो अपघातग्रस्त झाले. गोव्यातून बेळगावकडे गॅस सिलेंडर वाहतूक जाणारा टेम्पो समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोला बाजू देताना रस्त्यानजीक केबलसाठी खोदलेल्या गटारात कलंडला. तर त्याच आयशर टेम्पोचा काही अंतरावर टायर फुटल्याने गटारात कलंडला. सुदैवाने समोर वाहन नसल्याने अनर्थ टळला. यात टेम्पोचे मोठे नुकसान झाले. याबाबतची नोंद बांदा पोलिसांत उशिरापर्यंत नव्हती.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गोव्यातून गॅस सिलेंडर वाहतूक करणारा आयशर टेम्पो सावंतवाडीच्या दिशेने जात होता. समोरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पोला बाजू देताना टेम्पो रस्त्यानजीक खोदलेल्या गटारात रुतला. मात्र, गोव्याच्या दिशेने जाणारा टेम्पो पुढे काही अंतरावर टायर फुटल्याने सात जांभळी नजीकच्या उतारावर कलंडला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य केले. बांदा पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साहाय्याने दोन्ही टेम्पो बाहेर काढण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.