रेशनिंग धान्य वितरणासाठीची मुदत वाढवा

रेशनिंग धान्य वितरणासाठीची मुदत वाढवा

Published on

94889

रेशनिंग धान्य वितरणासाठीची मुदत वाढवा
शिवसेनेची मागणी : अन्न व नागरी पुरवठामंत्र्यांना दिले निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ५ : सिंधुदुर्गातील रेशन धान्य दुकानांमध्ये २२ जूननंतर धान्य दाखल झाले. त्‍यामुळे अनेक ग्राहक धान्यापासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे जूनमधील धान्य वितरणासाठी पंधरा दिवसांची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) जिल्‍हाप्रमुख संजय आंग्रे यांनी केली. याबाबतचे निवेदन त्‍यांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना दिले.
रेशनवर धान्य पुरवठा करणाऱ्या वाहनचालकांची देयके थकीत राहिली होती. त्‍यामुळे देयके मिळाल्‍याखेरीज धान्य पुरवठा करण्यास वाहनचालकांनी नकार दिला होता. त्‍यामुळे जूनमधील धान्य वितरण रखडले होते. याबाबत प्रशासन आणि धान्य वितरक यांच्यांत चर्चा झाल्‍यानंतर २२ जूनपासून धान्य वितरण सुरू झाले. यात अनेक रेशन धान्य दुकानांवर २३ तसेच २४ जूनपासून रेशन कार्डधारकांना धान्य वितरण सुरू करण्यात आले; मात्र सध्या असलेली शेतीची कामे, सर्व्हरमधील समस्या यामुळे अजूनही अनेक रेशन कार्ड ग्राहकांना जून महिन्यातील धान्य मिळण्याबाबत अडचणी येत आहेत.
या अनुषंगाने शिवसेना शिंदे गट जिल्‍हाप्रमुख संजय आंग्रे, सुनील पारकर, काका कुडाळकर, अभिनंदन मालंडकर यांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची मुंबईत भेट घेतली. त्‍यांना या समस्या दूर करण्याबाबतचे निवेदन दिले, तर श्री. भुजबळ यांनी जून महिन्यातील धान्य वितरणाबाबत पंधरा दिवस वाढवून देण्याबाबत पुरवठा विभागाला निर्देश दिले जातील, अशी ग्‍वाही दिली असल्‍याची माहिती आंग्रे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.