महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अकाउटन्सीचे धडे

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अकाउटन्सीचे धडे

Published on

-rat३p२६.jpg-

P२४M९४५४४
चिपळूण : सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेतर्फे डीबीजे महाविद्यालयात अकाउटन्सी म्युझियमचे उद्घाटन करताना सीए अभिलाषा मुळ्ये, सीए मुकुंद मराठे. सोबत डॉ. माधव बापट व सीए, प्राध्यापक.
-----------

विद्यार्थ्यांना पैशांचे मूल्य समजेल

डॉ. बापट ः डीबीजे महाविद्यालयात अकाउटन्सी म्युझियम

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ : अकाउटन्सी आणि गणित यांच्यात परस्पर संबंध आहे. या अकाउटन्सी म्युझियममुळे विद्यार्थ्यांना पैशांचे मूल्य, व्यवहारपद्धतींची माहिती मिळेल. एका अर्थाने अकाउटन्सीचे धडे मिळतील. आमचे महाविद्यालय चिपळूण व गुहागर क्लस्टरमधील अग्रणी महाविद्यालय असल्यामुळे या भागातील वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनासुद्धा म्युझियमचा लाभ घेता येईल, असे प्रतिपादन डीबीजे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट यांनी केले.
सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे डीबीजे कॉलेजमध्ये सीए दिन व जीएसटी वर्धापनदिनाच्या दिवशी अकाउटन्सी म्युझियम सुरू करण्यात आले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. म्युझियमचे उद्घाटन सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षा सीए अभिलाषा मुळ्ये, माजी अध्यक्ष सीए मुकुंद मराठे यांच्या हस्ते व प्राचार्य डॉ. बापट आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
भारतीय रूपया चलनात येण्यापूर्वी व्यवहारपद्धतींची माहिती देणारे अकाउटन्सी म्युझियम सुरू करण्यात आले असून, त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त बहुमुल्य माहिती मिळवण्यासाठी होईल, असा विश्वास सीए मुळ्ये यांनी व्यक्त केला. सीए मराठे यांनी अकाउटन्सी म्युझियमचे उद्घाटन सीए दिनाच्या दिवशी रत्नागिरी शाखेच्या सर्व पदाधिकारी आणि चिपळूणमधील नामांकित चार्टर्ड अकाउटंट या सर्वांच्या उपस्थितीत होणे हा दुग्धशर्करा योग आहे, असे नमूद केले. कार्यक्रमाला सीए शाखेचे उपाध्यक्ष शैलेश हळबे, सचिव केदार करंबेळकर, कोषाध्यक्ष अक्षय जोशी, माजी अध्यक्ष मुकुंद मराठे, प्रसाद आचरेकर, सुमेध करमरकर, चिन्मय काळे, जुली ओसवाल, मयुरेश पटवर्धन आदी उपस्थित होते.
-------------
चौकट १
म्युझियमची इच्छा पूर्ण
सीए अमित ओक यांनी डीबीजे महाविद्यालयाचा विद्यार्थी असल्यामुळे हे म्युझियम आपल्या महाविद्यालयात व्हावे, अशी इच्छा या निमित्ताने पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अकाउटन्सी विभागप्रमुख प्रा. चेतन खांडेकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या कौशल्य आधारित शिक्षणाची माहिती दिली. इंटर्नशिप/प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना संधी द्यावी, असे आवाहन सर्व सीएंना केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.