कडावलचे काशिराम राठवड जिल्ह्यातून प्रथम विशारद

कडावलचे काशिराम राठवड जिल्ह्यातून प्रथम विशारद

Published on

94965

कडावलचे काशिराम राठवड
जिल्ह्यातून प्रथम विशारद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ५ः भारतीय संगीत कलापीठ केंद्रच्या संगीत भजन, गायन परीक्षेमध्ये कडावल येथील काशिराम उर्फ सागर विलास राठवड यांनी सिंधुदुर्गातून प्रथम विशारद होण्याचा बहुमान मिळवला आहे.
मे मध्ये घेण्यात आलेल्या भारतीय संगीत कलापिठ केंद्रच्या सिंधुदुर्ग (एसआयएन-०१६) श्री जगन्नाथ संगीत विद्यालय केंद्रप्रमुख पखवाज अलंकार महेश सावंत यांच्या केंद्रच्यावतीने घेण्यात येणाऱ्या संगीत परिक्षेत त्यांनी हे यश मिळवले. भजन शिक्षण गुरुवर्य सूर्यकांत भिलारे, (कै.) प्रमोद सुतार, बाबल सुतार तसेच शास्त्रीय शिक्षण गुरुवर्य राजन माडये व संगीत अलंकार अजित गोसावी तसेच आई-वडील यांचा आशीर्वाद व मार्गदर्शनामुळे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील भजनी बुवा तसेच गायक, तबला वादक, पखवाज वादक यांना अशा प्रकारे संगीताचा अभ्यास करून परीक्षा द्याव्यात, यासाठी पखवाज अलंकार महेश सावंत (आंदुर्ले-कुडाळ) यांनी मोठे व्यासपीठ कलाकारांना उपलब्ध करून दिलेले आहे. याचा अनेक कलाकारांनी लाभ घ्यावा व संगीत कलेत आपल्या सिंधुदुर्गला पुढे न्यावे, असेही ते यावेळी म्हणाले. राठवड यांनी संगीत स्पर्धा तसेच भजन, गायन यामधून वैयक्तीक पारितोषिके पटकावली आहेत. अनेक स्पर्धांना परीक्षण म्हणून सुद्धा कार्य केले आहे. अनेक दिग्गज कलाकारांना हार्मोनियमची साथ केली आहे. देवश्री संगीत विद्यालयाचे ते संचालक असून त्यांचे संगीत भजन, सुगम संगीत, शास्त्रीय संगीताचे वर्ग चालू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.