उत्कृष्ट विद्यार्थी कल्याणी पाटीलचा सन्मान

उत्कृष्ट विद्यार्थी कल्याणी पाटीलचा सन्मान

Published on

rat५p५.jpg -
२४M९४८९७
हर्णै ः २०२४-२०२५ ची सर्वात उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून कल्याणी पाटील हिचा विशेष सन्मान करताना मान्यवर.

उत्कृष्ट विद्यार्थिनी कल्याणीचा सन्मान

अभियांत्रिकी, तंत्रज्ञान महाविद्यालयाचा वर्धापनदिन

सकाळ वृत्तसेवा
हर्णै, ता. ५ ः दापोली कोकण कृषी विद्यापीठामधील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचा २५वा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. या वेळी २०२४-२५ ची सर्वात उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून कल्याणी पाटीलचा विशेष सन्मान करण्यात आला.
महाविद्यालयाची स्थापना ३ जुलै १९९९ ला करण्यात आली होती. या स्थापनेत (कै.) डॉ. अशोक पोवार यांच्यासह अनेक आजी-माजी अधिकारी, कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. व्ही. एम. मायंदे-माजी कुलगुरू, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, डॉ. सईद इस्माईल-संचालक में. सिफा सांप्रा प्रा. लि. मुंबई, डॉ. संजय भावे-कुलगुरू-डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, डॉ. सचिन नांदगुडे- सहयोगी अधिष्ठाता-मालेगांव, डॉ. प्रशांत शहारे-सहयोगी अधिष्ठाता, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय दापोली, डॉ. मकरंद जोशी-सहयोगी अधिष्ठाता आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. मायंदे मार्गदर्शन करताना म्हणाले, कृषी अभियंता हा कृषी शिक्षण व कृषी यांत्रिकीकरण यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कृषी अभियंता विविध क्षेत्रामध्ये काम करून उत्पादकता वाढवू शकतो. सिफा कंपनीचे संचालक डॉ. सईद इस्माईल यांनी कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील परदेशातून प्रशिक्षण घेऊन आलेल्या व विविध प्रायव्हेट कंपनीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.