बांदा येथील विठ्ठल मंदिरात मंगळवारपासून वीणा सप्ताह

बांदा येथील विठ्ठल मंदिरात मंगळवारपासून वीणा सप्ताह

Published on

M95015

बांदा येथील विठ्ठल मंदिरात
मंगळवारपासून वीणा सप्ताह
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ५ ः येथील श्री विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही हरिनाम वीणा सप्ताहाला मंगळवारी (ता. ९) प्रारंभ होत आहे. या सप्ताहानिमित्त मंदिरात सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंगळवारी (ता. १६) सप्ताहाची सांगता होणार असून बुधवारी (ता. १७) आषाढी एकादशीचा भव्य सोहळा होणार आहे. या वीणा सप्ताहाच्या नियोजनासाठी पारप्रमुख व सेवेकरी मंडळींची मंदिरात बैठक झाली. या बैठकीला वीणा सप्ताह नियोजन प्रमुख प्रकाश मिशाळ, दत्तप्रसाद पावसकर, मंगलदास साळगांवकर, श्रीप्रसाद वाळके, उमेश काणेकर, सुदन केसरकर, अजय महाजन, राजेश पावसकर, विनीत पडते, गौरव महाजन, संदेश पावसकर, सुनील नाटेकर, मंथन विरनोडकर, अचल पावसकर, हर्षल बांदेकर, अजय नागझरकर, आशुतोष भांगले आदी उपस्थित होते.
यावेळी निश्चित केलेले सप्ताहाचे पार असे ः ९ ला आळवाडा-विनीत पडते, १० ला गांधी चौक-सुदन केसरकर, ११ ला निमजगा गवळीटेंब-संदेश पावसकर, १२ ला देऊळवाडी-श्रीप्रसाद वाळके, १३ ला हॉस्पिटल कट्टा-उमेश काणेकर, भाई शिरसाट, १४ ला मारुती गल्ली-दत्तप्रसाद पावसकर, १५ ला उभाबाजार-नीलेश महाजन. यावेळी श्री विठ्ठल नामाच्या गजरात भाविकांच्या उपस्थितीत वीणा घेऊन सप्ताहास सुरुवात होईल. १६ ला दुपारी १२ वाजता सप्ताहाची सांगता होईल. सप्ताहानिमित्त दररोज नामस्मरण, भजन, गजर, सायंआरती तसेच सायंकाळी ५ ते ६.३० अशी स्थानिक महिलांची भजनसेवा व रात्री १० ते १२ या वेळेत स्थानिक नित्य भजनकर्मींची भजनसेवा होईल. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री विठ्ठल मंदिर, बांदाच्यावतीने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.