प्रा. सुनील भोईर यांना ''गुजरात इन्फ्ल्युएन्सर'' राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

प्रा. सुनील भोईर यांना ''गुजरात इन्फ्ल्युएन्सर'' राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

rat५p२१.jpg-
२४M९४९४८
रत्नागिरी ः गुजरात येथे गुजरात इन्फ्ल्युएन्सर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित होताना प्रा. सुनील भोईर सोबत मान्यवर.

प्रा. सुनील भोईर यांना पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी, ता. ६ ः येथील अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेले प्राध्यापक सुनील भोईर यांना ''गुजरात इन्फ्ल्युएन्सर'' या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार वितरण सोहळा ३० जूनला गुजरातमध्ये बडोदा येथे दभोई दशालाल भवन येथे झाले. सीजीएमएचे अध्यक्ष अमित पटेल यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. गुजरातमधील विविध मान्यवरांच्या उपस्थित होते. सन्मानचिन्ह, मानपत्र, विशेष महावस्त्र, श्रीफळ, मानकरी बॅच असे पुरस्काराचे स्वरूप होते.

प्रा. भोईर यांनी आतापर्यंत विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिले आहे तसेच त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेत ‘जीसीएमए’ या संस्थेमार्फत आणि ईपिक फाउंडेशन गुजरात या संस्थेने बडोदा येथे प्रा. भोईर यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com