क्राईम पट्टा

क्राईम पट्टा

Published on

बाप-लेकास मारहाण

रत्नागिरी ः शहरातील शिवाजी स्टेडियम येथे भांडण शमविण्यासाठी गेलेल्या मुलासह त्याच्या वडिलांना संशयितांनी मारहाण केली. या प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. प्रणय सोनवणे व त्यांचा भाऊ (रा. शिवाजी स्टेडियम, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना गुरूवारी (ता. ४) रात्री घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुभम उमेश कर्लेकर (वय २५, रा. इंद्रप्रस्थ अपार्टमेंट, कर्लेकरवाडी, रत्नागिरी) हे व त्यांचे वडील संशयित प्रणय यांच्यात झालेल्या भांडणाबद्दल समजावण्यास गेले होते. त्या वेळी संशयितांनी शुभम यांच्या वडिलांना लाकडी काठीने मारहाण केली तर शुभम याच्या डाव्या हाताला दुखापत केली. या प्रकरणी शुभम कर्लेकर याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------

संशयिताला पोलिस कोठडी

रत्नागिरी ः रेल्वेच्या सुरत ते मंगलोर प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा ५० हजाराच्या लॅपटॉपच्या चोरीप्रकरणातील संशयिताना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रसाद जगन्नाथ पाटील (वय ३०, रा. भेरसे, ता. अलिबाग, जि. रायगड) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना ६ एप्रिलला सकाळी साडेचार ते पाच या सुमारास उक्षी रेल्वस्टेशनदरम्यान घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिशा रणजित (रा. कल्लाजल हाऊस, बेतवाल टी कोडमन, राज्य कर्नाटक) हे रेल्वेच्या सुरत ते मंगलोर गाडीतून प्रवास करत असताना चोरट्याने रत्नागिरी-उक्षी रेल्वेस्टेशनदरम्यान त्यांचा ५० हजाराचा लॅपटॉप पळविला. या प्रकरणी रणजित यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितास अटक केली. न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
-----
विष पिलेल्या तरुणावर
उपचार सुरू

रत्नागिरी ः गुहागर तालुक्यातील एका तरुणाने उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. अधिक उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आसीम जांभारकर असे त्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ५) सकाळी निदर्शनास आली. त्यांना तत्काळ उपचारासाठी त्याला आबलोली येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
------
एसटी-दुचाकीत अपघात

रत्नागिरी ः रेल्वेस्टेशन फाटा येथे एसटी बस व दुचाकीमध्ये झालेल्या धडकेत स्वार जखमी झाला. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. सचिन मधुकर वाडकर (रा. गयाळवाडी, रत्नागिरी) असे जखमी स्वाराचे नाव आहे. ही घटना गुरूवारी (ता. ४) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस ही देवरूख ते रत्नागिरी अशी येत होती तर सचिन हा दुचाकी घेऊन रत्नागिरी रेल्वेस्टेशन फाटा येथून जात होता. रेल्वे स्टेशन फाटा येथे काँक्रिटच्या रस्त्यावर दोन्ही वाहनांचा अपघात झाला. यामध्ये सचिन याला दुखापत झाली तसेच दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.
-------
चारचाकी चालकावर गुन्हा

संगमेश्वर ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गांवर तुरळ हरेकरवाडी येथे दुचाकीला धडक देणाऱ्या बोलेरो चालकावर संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धामणी ते आरवलीच्या दिशेने सुसाट वेगात जाणाऱ्या चारचाकी वाहन चालक परेश हेमंत देवरुखकर याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने विरुद्ध दिशेला जाणाऱ्या दुचाकीला फरफटत नेले होते. यात दुचाकीस्वार विघ्नेश करंडे हा गाडीवरून काही अंतरावर उडून गेला व त्याचा जागीच मृत्यू झाला होता. भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या चारचाकी चालक परेश हेमंत देवरुखकर याच्यावर संमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.