संक्षिप्त

संक्षिप्त

Published on

rat५p१९.jpg-
P२४M९४९४६
खेड : इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलतर्फे खेड रेल्वेस्टेशन येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिरात सहभागी कर्मचारी.

इन्फिगोतर्फे नेत्रतपासणी शिबिर

खेड : इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलतर्फे खेड रेल्वेस्टेशन येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिर झाले. या वेळी रेल्वेतील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिबिरादरम्यान ४० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला. शिबिरासाठी स्टेशनमास्तर रफिक नांदगावकर व अस्मिता सावंत उपस्थित होते. या शिबिरादरम्यान डोळ्यासंदर्भातील समस्या वेळीच लक्षात आल्या आणि या शिबिराचा सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना फायदा झाला.

-----------

rat५p२०.jpg-
P२४M९४९४७
रत्नागिरी : सोमेश्वर येथे लायन्स क्लबतर्फे प्राथमिक शाळेकरिता पत्रे देताना गणेश धुरी, विशाल ढोकळे, प्रदीप हरचिरकर आदी.

सोमेश्वरात ‘लायन्स’तर्फे
काजू रोपांचे वाटप

रत्नागिरी : लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीमार्फत सोमेश्वर गावातील शेतकऱ्यांना ४० काजूची झाडे लागवडीकरिता देण्यात आली तसेच मराठी शाळेत स्वच्छतागृहासाठी पत्रे दिले. या वेळी शाळेच्या आवारात वृक्षारोपणही करण्यात आले. या वेळी अॅड. महेद्र मांडवकर यांनी काजूची झाडे पुरस्कृत केली होती. लायन्स क्लबचे अध्यक्ष गणेश धुरी, सचिव विशाल ढोकळे, प्रदीप हरचिरकर उपस्थित होते. शालेय परिसरात १० झाडे लावण्यात आली. प्राथमिक शाळा सोमेश्वर या शाळेतील स्वछतागृहच्या शेडसाठी क्लबच्यावतीने पत्रे वाटप करण्यात आले. या सेवाकार्याला प्रदीप हरचिरकर यांनी चांगली पत्रे भेट दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.