लाडकी बहीणचे ४० हजाराचे उद्दिष्ट

लाडकी बहीणचे ४० हजाराचे उद्दिष्ट

लाडकी बहीणचे ४० हजारांचे उद्दिष्ट

आकाश लिगाडे : चिपळुणात शिबिर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ ः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चिपळूण शहरासह तालुक्यात वेगाने राबवण्यात येत आहे. प्रत्येक मंडलनिहाय व शहरात वॉर्डनिहाय शिबिराचे नियोजन केले आहे. याशिवाय नारिशक्ती दूत अॅपद्वारे कोणीही या योजनेसाठी अर्ज करू शकतो. चिपळूण तालुक्यातून सुमारे ४० हजार महिलांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी दिली. योजनेच्या जनजागृतीसाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लिगाडे म्हणाले, ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी तालुकास्तरावर प्रशासकीय बैठक घेतली जाणार नाही. ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, सरपंच हे सर्व त्या त्या गावातील सेंटरवर हजर राहतील. यासाठी वेळापत्रक तयार केले जात आहे. त्याप्रमाणे प्रत्येक गावातील ग्रामपंचायत अथवा सेंटरमध्ये जाऊन महिलांनी अर्ज करावा शिवाय कोणतीही महिला नारीशक्ती दूत अॅपद्वारे घरच्याघरी अर्ज करू शकते. शासनाने आता उत्पन्न दाखल्याऐवजी केशरी, पिवळे रेशनकार्ड तसेच मतदार ओळखपत्र लागू केले आहे. त्यामुळे सेतूकडे दाखल्यांसाठी गर्दी करण्याची गरज नाही. या योजनेसाठी कोणी पैशाची मागणी केल्याची तक्रार झाल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. तालुक्यात दररोज दाखल होणाऱ्या अर्जाची तहसील कार्यालयात छाननी होईल. त्यानंतर पुन्हा जिल्हास्तरावर छाननी केली जाईल. ३१ ऑगस्टपर्यंत दाखल होणाऱ्या अर्जदार महिलांना १ जुलैपासून प्रतिमहिना दीड हजाराचा लाभ मिळेल. त्यानंतर येणाऱ्या अर्जधारकांना त्या त्या महिन्यापासून लाभ मिळेल. या कामासाठी गावातील सुशिक्षित विद्यार्थ्यांची मदत घेता येऊ शकेल तसेच महाविद्यालयातील एनएसएसच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्याचे नियोजन असल्याचे प्रांताधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या वेळी तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी विशाल भोसले, गटविकास अधिकारी उमा घार्गे-पाटील व महिला बालकल्याणच्या सावंत आदी उपस्थित होत्या.
...............
मतदार नोंदणी सुरू

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण राज्यात मतदार नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे. यासाठी नियुक्त केलेले बीएलओ घरोघरी भेटी देत आहेत. ज्या मतदारांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, असे आवाहन प्रांताधिकारी लिगाडे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com