करूळ घाटरस्त्याचे काम निकृष्टच

करूळ घाटरस्त्याचे काम निकृष्टच

95081

करूळ घाटरस्त्यांचे काम निकृष्टच
नितेश राणेः पाहणीदरम्यान शाखा अभियंत्यांची कानउघडणी
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ५ः करूळ घाटरस्त्याचे काम निकृष्ट असून संरक्षक भिंतीचे डिझाईन चुकीच्या पध्दतीने तयार करण्यात आले आहे. या संपूर्ण कामाची सद्यस्थिती केंद्रीयमंत्री बांधकाममंत्री नितीन गडकरी यांच्या निर्दशनास आणून देणार असल्याचे मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त करतानाच कामाच्या दर्जावरून महामार्ग प्रधिकरणच्या शाखा अभियंत्याची चांगलीच कानउघडणी केली.
आमदार राणे यांनी आज सायंकाळी करूळ घाटरस्त्यांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत तालुकाध्यक्ष नासीर काझी, प्रमोद रावराणे, अरविंद रावराणे, नेहा माईणकर, सुधीर नकाशे, राजेंद्र राणे, भालचंद्र साठे, संजय सावंत, प्रदीप रावराणे, हुसेन लांजेकर, प्राची तावडे, संताजी रावराणे आदी उपस्थित होते.
आमदार राणे यांनी करूळ येथील पुलाची आणि करूळ घाटातील कोसळलेल्या संरक्षक भिंतीची पाहणी केली. यावेळी ते चांगलेच संतप्त झाले. त्यांनी महामार्ग प्रधिकरणचे शाखा अभियंता डी. जी. कुमावत यांना कामाच्या दर्जावरून चांगलेच धारेवर धरले. संरक्षक भिंतीचे चुकीच्या पध्दतीने केलेले डिझाईन आणि निकृष्ट काम यामुळेच ही भिंत कोसळली आहे. रस्त्याचे झालेले कामच निकृष्ट आहे. केंद्र शासनाने कोट्यावधी रूपयांचा निधी दिला हा अशा पध्दतीने कामे करण्यासाठी नाही. जनतेच्या पैशाचा अपव्यय होत आहे. हा माझा मतदारसंघ आहे. अधिकारी आणि ठेकेदार करीत असलेल्या निकृष्ट कामामुळे आम्ही बदनाम होतो. येत्या पंधरा दिवसांत करूळ येथील पुलाची डागडुजी करा, घाटातील गटारांची कामे पुर्ण करा, अशी सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. करूळ घाटरस्त्यांच्या कामाच्या सद्यस्थिती मी केंद्रीयमंत्री गडकरी यांच्या निर्दशनास आणुन देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
---------
चौकट
लोकांच्या जीवाशी खेळू नका
निकृष्ट कामामुळे जर दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण0 असा प्रश्न उपस्थित करीत आपण सर्व लोकांच्या जीवाशी खेळ करीत आहात. हा खेळ आम्ही खपवून घेणार नाही. लोकांच्या जीवाशी खेळ करू नका, असा इशारा आमदार राणे यांनी अधिकाऱ्यांना दिला.
-----------
चौकट
हमीशिवाय वाहतुकच नाही
करूळ घाटरस्त्यांची आम्ही क्वॉलिटी कंट्रोलमार्फत तपासणी करून घेणार आहोत. जोपर्यत करूळ घाटरस्ता निर्धोक बनत नाही, वाहतुकीस सुरक्षित होत नाही, तोपर्यत कुणीही काहीही केले तरी आम्ही वाहतुक सुरू करू देणार नाही. सुरक्षिततेची हमी महामार्ग प्रधिकरण पहिली आम्हाला दिली पाहीजे, असे देखील आमदार राणे यांनी स्पष्ट केले.
-----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com