मालवणला गांजासह दोघेजण ताब्यात

मालवणला गांजासह दोघेजण ताब्यात

Published on

मालवणला गांजासह
दोघेजण ताब्यात
मालवण, ता. ५ : गोपनीय माहितीच्या आधारे मालवण आडारीवाडी मार्गांवर येथील पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत दोघा युवकांना ४७० ग्रॅम गांजासह दोघांना ताब्यात घेतले. यात एक दुचाकीही पोलिसांनी जप्त करण्यात आली आहे.
विशाल वडर (वय २७, रा. पोईप), आदित्य नेरुरकर (वय २६, रा. विरण) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित युवकांची नावे असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मालवण परिसरात घडलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे व पथकाने गोपनीय माहिती आधारे ही कारवाई केली. कारवाई पथकात पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक आनंदा यशवंते, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, पोलीस कर्मचारी सुशांत पवार, प्रतीक जाधव, राजाराम तेरेखोलकर, महादेव घागरे यांसह अन्य कर्मचारी सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.