‘पीएम पीक विमा’चा लाभ घ्या

‘पीएम पीक विमा’चा लाभ घ्या

Published on

‘पीएम पीक विमा’चा लाभ घ्या

विजयकुमार राऊत ः शेतकऱ्यांना सहभागासाठी १५ पर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ६ ः खरीप हंगाम २०२४ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत १५ जुलै आहे. एक रुपयात पीक विमा हप्ता भरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले.
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी प्रधानमंत्री पीक योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी शेतकऱ्यांना पेरणी न होणे तसेच पूर, दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान व काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरिता विमा संरक्षण लाभणार आहे.
खरीप हंगामामध्ये कोकण विभागामधील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात भात, नाचणी या पिकांकरिता पीक विमा उतरविता येईल. शेतकरी हिश्श्याचा विमा हप्त्या १ रुपया रक्कम वजा जाता राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याचे घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या मुदतीच्या सात दिवस आधी बँकेत सादर करावे. घोषणापत्र दिलेल्या शेतकऱ्यांना योजनेच्या सहभागातून वगळण्यात येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात पिकासाठी अधिसूचित असलेल्या ५७ महसूल मंडलांमध्ये, नाचणी पिकाकरीता अधिसूचित ५२ महसूल मंडलांमध्ये ही योजना लागू केली आहे. जिल्ह्यामध्ये नियुक्त युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.