रामगड विद्यामंदिरतर्फे 
वृक्षदिंडीतून जागृती

रामगड विद्यामंदिरतर्फे वृक्षदिंडीतून जागृती

Published on

रामगड विद्यामंदिरतर्फे
वृक्षदिंडीतून जागृती
ओरोस ः रामगड येथील प्रगत विद्यामंदिर येथे कृषिदिन उत्साहात साजरा करण्यात आला. आंबा, साग, सुरंगी, कैलासपती अशा विविध झाडांची लागवड करण्यात आली. मुलांना सेंद्रीय शेती व नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून देण्यात आले. छ्त्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस-ओरोसच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. मुख्याध्यापक अंकुश वळंजू आदी उपस्थित होते. कृषिदिनानिमित्त कृषीदिंडीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देऊन आंबा, साग, सुरंगी, कैलासपती अशी विविध झाडे लावण्यात आली. कृषिदिनानिमित्त सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेतीचे महत्त्व विशद करण्यात आले. कृषीदूत राम बिबवणेकर व श्रीपाद वास्कर यांनी विविध कृषी क्षेत्रातील संधी व नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापक वळंजू, क्रीडाशिक्षक सावंत यांनी मार्गदर्शन केले. यानंतर भव्य वृक्षदिंडी रामगड बाजारपेठमधून काढण्यात आली. शाळेच्या क्रीडांगण परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिक्षक कांबळे, देशमुख, कृषिदूत हर्षवर्धन भोसले, प्रतीक चौगले, ओंकार पाटील, शुभम जाधव, राम बिबवणेकर, श्रीपाद वास्कर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.