वृक्षदिंडी कार्यक्रम उत्साहात

वृक्षदिंडी कार्यक्रम उत्साहात

Published on

-rat६p६.jpgः
P२४M९५१०८
रत्नागिरी ः अ. के. देसाई हायस्कूल येथे वन महोत्सावात सहभागी झालेले विद्यार्थी व मान्यवर.
-----------
देसाई हायस्कूलमध्ये वृक्षदिंडी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ ः येथील सामाजिक विनीकरण विभाग, कांदळवन संवर्धन विभाग आणि मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूल राष्ट्रीय हरित सेना विभागातर्फे वन महोत्सवानिमित्त वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले. हायस्कूलच्या पाचवी ते दहावी व हरितसेनेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडीची पालखी प्रदक्षिणा करुन ''झाडे लावा, झाडे जगवा'' असा सामाजिक संदेश दिला.
वृक्षदिंडीची पालखी प्रशालेचे मुख्याध्यापिका प्रज्ञा दळी व सामाजिक विनीकरणाच्या अधिकारी एफआरओ स्नेहल अडसुळ यांनी खांद्यावर घेऊन वृक्षदिंडीला सुरवात केली. त्यानंतर मुख्याध्यापिका दळी व सामाजिक वनीकरणचे अधिकारी अडसूळ यांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच राष्ट्रीय हरीत सेनेच्या विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात वृक्षारोपण केले. यावेळी विद्यार्थ्यांनी झाडे आम्ही नक्कीच जागवू असा आत्मविश्वास व्यक्त केला. यानिमित्ताने माजी विद्यार्थ्यांतर्फे गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
या वेळी वनपाल नीलेश कुंभार, वनरक्षक मिताली कुबल, शर्वरी कदम, प्रभू साबणे, किरण पाचारणे, स्वस्तिक गावडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शर्वरी कदम, संतोष गार्डी, जयसिंग लोहार, सचिन मोहिते यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.