एकविध खेळ संघटनेतर्फे  
सिंधुदुर्गनगरीत ११ ला बैठक

एकविध खेळ संघटनेतर्फे सिंधुदुर्गनगरीत ११ ला बैठक

Published on

एकविध खेळ संघटनेतर्फे
सिंधुदुर्गनगरीत ११ ला बैठक

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ६ : जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२४-२५ चे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात नव्याने समावेश झालेल्या एकविध खेळ संघटनेची बैठक गुरुवारी (ता.११) सायंकाळी ४ वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे होणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा एकविध खेळ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने २०२४-२५ या सत्रातील जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन व नियोजन करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील नव्याने समावेश झालेल्या खेळ प्रकारातील अधिकृत राज्य संघटनेशी संलग्न जिल्हा एकविध खेळ संघटनांचे अध्यक्ष व सचिव यांची बैठक क्रीडा अधिकारी शिरस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे आयोजित केली आहे. या बैठकीस उपस्थित राहताना अधिकृत राज्य संघटनेला संलग्न असलेले पत्र तसेच वेळापत्रक सोबत आणावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा आधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.