हुमरमळा-वालावल शाळेच्या
इमारतीबाबत चालढकल का0

हुमरमळा-वालावल शाळेच्या इमारतीबाबत चालढकल का0

Published on

हुमरमळा-वालावल शाळेच्या
इमारतीबाबत चालढकल का?

सरपंचांचा प्रश्‍न; अधिकाऱ्यांना लिहिले पत्र

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ ः हुमरमळा-वालावल श्री रामेश्वर विद्यामंदिर शाळेसाठी आमदार वैभव नाईक यांनी २० लाखांचा निधी मंजूर करूनही अद्याप इमारत कामाबाबत चालढकल का केली जात आहे, असा प्रश्‍न सरपंच अमृत देसाई आणि शिवसेनेचे अतुल बंगे यांनी केला आहे. याबाबत पंचायत समिती गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना पत्र देण्यात आले.
पत्रात म्हटले आहे की, हुमरमळा-वालावल रामेश्वर विद्यामंदिर या प्राथमिक शाळेत किमान ३० विद्यार्थी शिकत आहेत. ही इमारत मोडकळीस आल्याने पालकांनी उठाव करत आमदार नाईक यांची हुमरमळा येथे कार्यक्रमात भेट घेतली. नाईक यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे २० लाख रुपयांचा निधी नियोजनमधून मंजूर करून घेतला; परंतु आचारसंहितेचे कारण पुढे करून या कामात चालढकलपणा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थी स्थलांतरित करण्यात आले आहेत, असे श्री. देसाई व बंगे यांनी सांगितले. शाळेच्या इमारतीसाठी निधी मंजूर असून, शिक्षण विभाग चालढकलपणा करीत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत धोकादायक स्थितीत ठेवले जात आहे, असा आरोप करत येत्या दहा दिवसांत शाळा बांधकाम करण्यासंदर्भात शिक्षण विभागाने हालचाली केल्या नाहीत तर १५ ऑगस्टला पालक व विद्यार्थ्यांच्या समवेत पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात विद्यार्थ्यांची शाळा भरवू, असा इशारा बंगे व देसाई यांनी दिला आहे.
95156

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.