महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेचे बेमुदत आंदोलन

महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेचे बेमुदत आंदोलन

Published on

महिला, कर्मचारी संघटनेचे
मुंबईत उद्यापासून आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ६ ः महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये कार्यरत असणाऱ्‍या कर्मचारी, केडर व संस्थांमधील महिलांच्या महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. ८ जुलैपासून आझाद मैदान येथे त्यांच्या हक्काच्या न्याय मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने बेमुदत अंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय आजिविका मिशनअंतर्गत राज्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान शासनाच्या माध्यमातून राबवले जाते. या अभियानात सद्यःस्थितीतील ५५ हजार स्वयंसाहाय्यता समुहात ८५ लाख ग्रामीण गरीब कुटुंबातील महिलांचा समावेश झाला आहे. अभियानात सद्यःस्थितीत सीएससी या बाह्ययंत्रणेद्वारे कर्मचारी भरती केली जात आहे तसेच तुटपुंज्या मानधनावर आणि विविध समस्यांना तोंड देत केडर व कर्मचारी यांना काम करावे लागत आहे. हे अभियान २०२६ मध्ये बंद करणार असे शासनाच्या पत्रात म्हटले आहे. २०२६ मध्ये हे अभियान बंद झाले तर ५५ हजार संस्था व त्यात समाविष्ट झालेल्या ८५ लाख महिलांची कुटुंब आणि केडर व कर्मचारी यांच्या कुटुंबावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. सदरचा विभाग शासनाने कायम करावा व शाश्वत ग्रामीण विकासासाठी काम करणारे कर्मचारी आणि केडर यांना शाश्वतता द्यावी यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी हे बेमुदत अंदोलन महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेने पुकारले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.