तावडे, स्वतःच्या प्रभागातील 
कामे बघा ः विवेक रावराणे

तावडे, स्वतःच्या प्रभागातील कामे बघा ः विवेक रावराणे

तावडे, स्वतःच्या प्रभागातील
कामे बघा ः विवेक रावराणे

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ६ ः नगरसेवक रणजित तावडे हे स्वतःच्या प्रभागात कोणतेही काम करू शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी आमच्यावर टीका करण्यापूर्वी आपल्या प्रभागातील कामे मार्गी लावावीत, असा टोला वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीचे बांधकाम सभापती विवेक रावराणे यांनी लगावला.
वाभवे-वैभववाडी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील विविध समस्यांच्या छायाचित्रांचे फलक शहरात उभे केले होते. त्यानंतर तावडे यांनी नगरपंचायतीच्या कारभारावर टीका केली होती. या टीकेला श्री. रावराणे उत्तर दिले आहे. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, विरोधी नगरसेवक हेच वैभववाडी नगरपंचायतीच्या कामाचे ठेकेदार आहेत, हे तावडे यांनी आपल्या वक्तव्यातून कबुल केले आहे. त्यावरूनच शासनाचा पैसा कुणाच्या घशात गेला, हे स्पष्ट होते. विरोधकांनी आतापर्यंत नगरपंचायतीची छुप्या पद्धतीने किती कामे केली आहेत, हे देखील आम्हाला नावानिशी स्पष्ट करावे लागेल. शक्य असेल तर त्यांनी सुरुवातीला आपल्या प्रभागातील कामे पूर्ण करून आपले कर्तृत्व सिद्ध करावे, असे रावराणे यांनी म्हटले आहे. दरम्यान, शिक्षण व आरोग्य सभापती राजन तांबे यांनीही तावडे यांच्यावर टीका केली आहे. शाळेच्या संरक्षक भिंतीची आवश्यक समंतीपत्र मिळवून देण्यात तावडे असमर्थ ठरले; मात्र दत्तमंदिर शाळेच्या संरक्षक भिंतीचा प्रश्न सोडविला असून, त्याकरिता १४.२४ लाखांचा निधी प्राप्त आहे. त्यामुळे तावडे यांनी त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून किती विधायक कामे केली हे जाहीर करावे, असे आव्हानदेखील त्यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com