-मगरींच्या बंदोबस्तासाठी ठोस निर्णय

-मगरींच्या बंदोबस्तासाठी ठोस निर्णय

- ratchl६२.jpg-
२४M९५२१९
चिपळूण ः तहसील कार्यालयात मगरींच्या विषयावर झालेली बैठक.
------------------

मगरींच्या बंदोबस्तासाठी ठोस निर्णय

आमदार निकम ; संरक्षित करण्यासाठी प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ६ ः शहर परिसरात पावसाळ्यात नागरी वस्तीत व रस्त्यांवर होणारा मगरींचा मुक्त संचार या पार्श्वभूमीवर मगरींचा बंदोबस्त करावा यासाठी आज येथील तहसील कार्यालयात आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत बैठक झाली. वनमंत्र्याबरोबर बैठक घेऊन पहिल्या टप्प्यात शहरातील तलाव, पाणवठे येथील मगरी बाहेर काढून संरक्षित करण्यासंदर्भात प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार निकम यांनी बैठकीत दिले.
बैठकीला प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, वनविभागाचे सहायक वनरक्षक बोराडे, मुख्याधिकारी विशाल भोसले, बापू काणे, किशोर रेडीज, आदिती देशपांडे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मिलिंद कापडी, उदय ओतारी, महेंद्र कासेकर, दादा साळवी, जयंद्रथ खताते आदी उपस्थित होते. या वेळी बापू काणे यांनी शहरात मगरींचा संचार सुरू आहे. त्यामुळे नागरिक भयभीत आहेत. त्यामुळे मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. त्यावर आमदार शेखर निकम यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी, विभागीय वनाधिकारी व वनमंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात येईल. आपण विधीमंडळात हा प्रश्न मांडला आहे. वनकायद्याचा अभ्यास करून सुरवातीला तलावातील मगरी संरक्षित करण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले. शहरातील होणारा मोकाट कुत्र्यांचा वावर या विषयावर चर्चा झाली. सद्यःस्थितीत कायद्याने कुत्र्यांची नसबंदी करणे एवढाच उपाय असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. ----------
परिक्षेत्र वनाधिकारी गैरहजर

बैठकीला परिक्षेत्र वनाधिकारी राजश्री कीर गैरहजर राहिल्या. चिपळुणातील नागरिकांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन दिले असताना व बैठकीची तारीख आधीच जाहीर असतानाही त्या उपस्थित राहिल्या नाहीत. परिणामी, उपस्थितांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com