-संदीप सावंतांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न

-संदीप सावंतांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न

Published on

सावंतांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न

जितेंद्र चव्हाणांचा आरोप; आमदार जाधवांकडून चांगले काम
सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. ६ ः माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काही दिवसांपूर्वी पदमुक्त केले; मात्र पदावरून काढल्यानंतर सावंत यांची बडबड सुरू झाली आहे. सातत्याने ते शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्यावर टीका करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अधिवेशन काळात केवळ एकच दिवस ते गावी शेती व इतर कामासाठी आले. त्याचदिवशी त्यांनी मुंबईत मतदार संघातील चाकरमान्यांचा मेळावा घेतला. अधिवेशनात ते सरकारच्या विरोधात आवाज उठवत असताना सावंत मात्र दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तालुकाप्रमुख जितेंद्र चव्हाण यांनी केला आहे.
संदीप सावंत यांच्या वक्तव्यावर तालुकाप्रमुख जितेंद्र चव्हाण म्हणाले, गुहागर विधानसभा मतदार संघात संदीप सावंत यांनी ७ ते ८ वर्षे तालुकाप्रमुख पद उपभोगले. काही दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सावंत यांना पदावरून काढण्यात आले. नवनिर्वाचित तालुकाप्रमुख म्हणून जितेंद्र चव्हाण यांची पक्षाने निवड केली. त्यानंतर सावंत सोशल मीडियावर बडबड करत आहेत. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी शेती सोडलेली नाही. ते दरवर्षी भातशेती करतात. अधिवेशन काळात ते नेहमी सरकारचे वाभाडे काढत आहेत. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांवर सातत्याने आवाज उठवत आहेत. असे असताना सावंत समाजात आमदारांबद्दल चुकीची माहिती पसरवण्याचे काम करत आहेत. एकेकाळी विधानसभा निवडणुकीत सावंताचे डिपॉझिट जप्त झाले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.