चिपळूण ःमहामार्गाचे काम करताना सुरक्षेच्या उपाययोजना करा

चिपळूण ःमहामार्गाचे काम करताना सुरक्षेच्या उपाययोजना करा

Published on

- ratchl61.jpg
95218
चिपळूण ः अडकलेल्या कामगारास क्रेनच्या साह्याने काढण्यात आले.

महामार्गाचे काम करताना
सुरक्षेच्या उपाययोजना करा

आमदार निकमांचे आदेश; जखमी कामगारांची प्रकृती स्थिर

चिपळूण, ता. ६ ः मुंबई-गोवा महामार्गावरून शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या पिअरकॅपचे कटिंग सुरू असताना शुक्रवारी (ता. ५) अपघात झाला. यामध्ये जखमी झालेल्या तीन कामगारांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, महामार्गाचे काम करताना सुरक्षेसाठी दोन्ही बाजूने बॅरिकेड्‌स लावण्याच्या सूचना आमदार शेखर निकम यांनी दिल्या आहेत. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग विभागाने ठेकेदार कंपनीस सुरक्षेच्या उपाययोजना बाळगून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, दुर्घटनेनंतर थांबलेले काम आजपासून पुन्हा सुरू करण्यात आले.
राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना तिसऱ्यांदा अपघात घडला. या दुर्घटनेनंतर शनिवारी आमदार शेखर निकम यांनी दुर्घटनेबाबत येथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यापुढे महामार्ग उड्डणपुलाचे कामे करताना जनतेला, तेथून जाणाऱ्या वाहनचालकांना कोणताही त्रास होता कामा नये यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूने पत्रा ठोकून आतमध्ये कामे करावीत. सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्यादृष्टीने कंत्राटदार कंपनीला नोटीस देण्यात यावी, असे आमदार निकम यांनी तहसीलदार प्रवीण लोकरे यांना सांगितले.
दरम्यान, गंभीर झालेल्या तिन्ही कामगारांची प्रकृती स्थिर असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या उपाययोजनांत कंपनीकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप उपस्थितांकडून करण्यात आला. यापुढे ज्या ठिकाणी उड्डाणपुलासंदर्भात काम सुरू असेल तिथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्‌स लावून आतमध्ये काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.